MLA Praniti Shinde: ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो: आमदार प्रणिती शिंदे

MLA Praniti Shinde: कोण रोहित पवार?

0

सोलापूर,दि.10: काँग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो” असं म्हणत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांना सुनावलं. (Praniti Shinde On Rohit Pawar)

काय म्हणाले होते रोहित पवार?

सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे की राष्ट्रवादीकडे राहील याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नुकतेच सोलापुरात केले होते. यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करीत आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघ मागू असे म्हटले होते.

यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शहरातील नेत्यांमध्ये शाब्दिक वार सुरू होते. रोहित पवार यांच्या विधानाबाबत आमदार प्रणिती शिंदे यांना पत्रकारांनी शुक्रवारी प्रतिक्रिया विचारली.

प्रणिती शिंदे यांची रोहित पवारांवर टीका | Praniti Shinde On Rohit Pawar

“कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल” असं म्हणत प्रणिती शिंदेंनी कडक शब्दांत उत्तर दिलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here