Deepak Kesarkar: शिवसेनेबाबत आमदार दीपक केसरकर यांचं मोठं विधानं

0

दि.25: Deepak Kesarkar: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. शिवसेनेचे 38 पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत. राष्ट्रवादी बरोबर राज्यात सरकारमध्ये राहण्यास हे सर्व आमदार इच्छुक नाहीत. शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल 42 आमदारांनी बंड पुकारलं आहे. दोन्ही बाजूंनी दावे अन् प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे हा वाद आता न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे पक्षाला भगदाड पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे देखील पक्ष संघटना टिकवून ठेवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊ लागले आहेत. बंड पुकारलेले एकनाथ शिंदे काल गुवाहटीहून दिल्लीत पोहोचल्याची माहिती समोर आली होती. तसंच भाजपा नेत्यांकडूनही दिल्लीत सध्याच्या परिस्थितीवर खलबतं सुरू आहेत. त्यामुळे राज्यात सत्तापालट पाहायला मिळणार की महाविकास आघाडीचच सरकार कायम राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

ज्या व्यक्तीने रस्त्यावर उतरायला सांगितलं त्यावर महाराष्ट्र सरकारने कारवाई केलेली नाही. अन्य व्यक्तीने असं सांगितलं असतं तर कारवाई केली असती की नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे नेतृत्व करत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचे नॉर्म पाळावेत ही आमची विनंती आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.

आम्ही कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही, तशी गरजच नाही. दोन तृतियांश बहुमत आम्ही सिद्ध करू शकतो. आम्हीच शिवसेना आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना हायजॅक करायचा प्रयत्न केला होता. शिवसेनेचं अस्तित्व टिकावं म्हणून हा निर्णय घेतला आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.

आम्ही शिवसेना सोडलेली नाही”आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही शिवसेनेच्याच तिकीटावर निवडून आलेले आमदार आहोत. आम्ही शिवसेना सोडल्याच्या चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत”, असं स्पष्टीकरण दिपक केसरकर यांनी दिलं आहे.

शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here