पुणे,दि.5: MLA Bapu Pathare: शरद पवार गटाच्या आमदाराला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे (MLA Bapu Pathare) यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे.
MLA Bapu Pathare: शरद पवार गटाच्या आमदाराला धक्काबुक्की
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर राजकारण तापलं आहे. आमदार बापू पठारे यांना लोहगावमध्ये (पुणे जिल्हा) अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बंडू खांदवे यांच्याकडून धक्काबुक्की झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर लोहगाव परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळेच हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या जमावाला बाजुला केल्याने मध्यरात्री 12 च्या सुमारास तणाव निवळला.
लोहगाव परिसरात एका कार्यक्रमाचं आयोजन केले होते. लोहगाव वाघोली रोडवरील गाथा लॅान्स येथे एका माजी सैनिकांच्या सत्काराचा नियोजित कार्यक्रम होता. त्यासाठी बापूसाहेब पठारे तीथे कार्यक्रमाला येत होते. त्याच कार्यक्रमातून लोहगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य बंडू खांदवे बाहेर येत असताना आमदार पठारे यांची एन्ट्री झाली. तेथे दोघांमध्ये शाब्दिक वाद पेटला त्यानंतर झटापट होऊन त्यांचे पर्यावसान धक्काबुक्कीत झाली. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने परिसरात पसरल्याने मोठा जमाव गाथा लॉन परिसरात जमला होता.








