मुंबई,दि.१०: Minister Babasaheb Patil On Farmer Loan: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच बाबासाहेब पाटील यांचे विधान जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
काय म्हणाले बाबासाहेब पाटील? | Minister Babasaheb Patil On Farmer Loan
बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर एक वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, लोकांना कर्जमाफीची सवय लागली आहे आणि आम्हाला निवडून यायचे असल्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासने देतो. लोकांनी ठरवायला हवं की त्यांनी काय मागायचं आहे.
शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पॅकेज जाहीर केले असताना मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे असं वादग्रस्त विधान केले. तसेच आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो अशीही कबुली मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.








