मुंबई,दि.13: सर्वच राजकीय पक्ष लोकसभा 2024 ची तयारी करत आहेत. अनेक इच्छुक नेते मतदार संघात प्रचाराला लागले आहेत. तर महाराष्ट्रात भाजपा, शिंदे गट व अजित पवार गट हे सत्तेत आहेत. तर ठाकरे गट, शरद पवार गट व काँग्रेस हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणूक हे सर्व पक्ष युती करून लढणार असे चित्र आहे. जागा वाटपात अनेक इच्छुक उमेदवाराची निराशा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत.
राज्यातील महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद असून, हा वाद चव्हाट्यावर येत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे महायुतीने तयारीला सुरुवात केली आहे. यातच आता काँग्रेसचा मुंबईतील एक बडा नेता नाराज असून, लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतो, असा कयास बांधला जात आहे. यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेस नेते मिलिंद देवरा काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची माहिती आहे. ते आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचीही शक्यता आहे. काँग्रेसला राम-राम करत मिलिंद देवरा हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. देवरा शिवसेना शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. जर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. देवरा जर शिंदे गटात गेले तर शिवसेना आणि पर्यायाने महायुतीची ताकद वाढणार आहे.
तिकीट मिळण्याची शक्यता सध्या कमी
मिलिंद देवरा हे काँग्रेसचे बडे नेते आहेत. मुंबईत विशेषत: दक्षिण मुंबईत त्यांचा होल्ड आहे. काँग्रेसमध्येही त्यांचा मोठा समर्थक वर्ग आहे. अशाचत ही निवडणूक लढण्याची मिलिंद देवरा यांची इच्छा आणि तयारी आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मात्र या जागेवर देवरा यांनी तिकीट मिळण्याची शक्यता सध्या कमी दिसते आहे. त्यामुळे देवरा काँग्रेसमध्ये नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे देवरा काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊ शकतात.