विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी व्यापाऱ्याचा अटक पूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि. 23: सोलापूर येथील राजू लक्ष्मण रोहिटे वय 38 याची विवाहितेचे विनयभंग केल्याप्रकरणी युवा व्यापारीचा अटक पूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश यु एल जोशी यांनी मंजूर केला. युवा व्यापारी राजू लक्ष्मण रोहिटे व पीडित महिलेचे पती हे सम व्यावसायीक आहेत आरोपी राजू लक्ष्मण रोहिटे व त्यांच्या पत्नी, मूल आजारी असल्याने विचारपुस करण्यास त्याचे घरी दि. 22/1/2022 रोजी गेले होते व तिथेच जेवण करून पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली, असता पाठीमागून आरोपी राजू रोहीटे जाऊन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला. त्यावेळी पीडित विवाहित महिला आरडा वरडा करून त्याच्या तावडीतून निसटून हॉल मध्ये आली व सदर घटने बद्दल त्याचा पतीस सांगितली.

सदर बाबत रात्री 11.30 झाल्याने पोलिस स्टेशनला फिर्याद दिली नाही. दिनांक 23/1/2022 रोजी रात्री 11.33 वा. जोडभावी पोलिस स्टेशनला भा. द. वी सह.कलम 354 अन्वय फिर्याद दिली. सदर गुन्ह्यात अटक होईल म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.

सदर अर्जाची सुनावणी होऊन बचाव पक्षाचे वकील ॲड. राजेंद्र फताटे यांनी, फिर्याद दाखल करण्यात 36 तासाचे उशीर झाला आहे. केवळ आरोपी देणे रुपये 150000/द्यावे लागेल म्हणून पतीसी विचार विनिमय करून खोटी फिर्याद दिली होती, सदर युक्तिवाद मान्य करून आरोपी राजू लक्ष्मण रोहिटे यास तपास कामात पोलिस अधिकाऱ्यांस सहकार्य करावे व दोषारोपत्र दाखल हईपर्यंत दर 15 दिवसांनी पोलिस स्टेशनला हजेरी लावावी या अटी वर अटक पूर्व जामीन मंजूर केला.

यात राजू लक्ष्मण रोहिटे वतीने ॲड. राजेंद्र फताटे व राजकुमार राजमाने तर सरकार वतीने ॲड. प्रकाश जन्नु काम पाहिले


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here