मुंबई,दि.5: जुनागढमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल गुजरात पोलिसांनी रविवारी मुंबईस्थित इस्लामिक धर्मोपदेशक मौलाना सलमान अजहरी याला ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांनी मौलाना आणि इतर दोघांविरुद्ध कलम १५३ (सी), ५०५ (२), १८८ आणि ११४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सलमान अजहरीला प्रथम घाटकोपर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मौलानाचे शेकडो समर्थक घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर जमले आणि त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली, त्यामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली आणि पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली.
दरम्यान, मौलाना सलमान अझरी यांनी पोलीस स्टेशनबाहेर जमलेल्या आपल्या समर्थकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याची विनंती केली. मौलाना यांनी घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या जमावाला माईकद्वारे संबोधित करत शांतता राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “मी गुन्हेगार नाहीय. मला कुठल्या गुन्ह्यासाठी इथे आणलेलं नाहीय. ते आवश्यक चौकशी करतायत आणि मी त्यांना सहकार्य करतोय. माझ्या नशिबात लिहील असेल, मला अटक झाली, तर त्यासाठी सुद्धा मी तयार आहे” मौलान अजहरीला दोन दिवसांचा ट्रांजिट रिमांड देण्यात आला आहे. गुजरात पोलीस त्यांना घेऊन जुनागढला रवाना झाले आहेत.
मौलाना सलमान अझहरी विरुद्धच्या खटल्याच्या संदर्भात, गुजरात पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) कलम 153B (वेगवेगळ्या धार्मिक गटांमधील वैर वाढवणे) आणि 505 (2) (जनमताला भडकावणे) अंतर्गत आधीच गुन्हा दाखल केला आहे. दोन स्थानिक आयोजकांची ओळख पटली. मोहम्मद युसूफ मलेक आणि अझीम हबीब ओडेदरा यांना अटक करण्यात आली आहे. मुफ्ती अझरी यांनी गेल्या बुधवारी जुनागडमधील सेक्शन बी भागात एका कार्यक्रमादरम्यान आक्षेपार्ह भाषण केले होते.
शनिवारी त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला, त्यानंतर पोलिसांनी जुनागडमधील कार्यक्रमाच्या आयोजकांना अटक केली आणि मौलानाला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोजकांनी अजहरीचा पत्ता धर्म आणि व्यसनमुक्तीबद्दल जनजागृती करणार असल्याचे सांगत कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती. पण त्यांनी भाषणात भडकाऊ शब्द वापरले. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मौलाना अझहरीच्या वकिलाने सांगितले की, इस्लामिक धर्मोपदेशक तपासात सहकार्य करण्यास तयार आहे, परंतु या संदर्भात पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.