चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यामुळे सलून मालक झाला करोडपती

0

दि.२८ : युएईमध्ये आयपीएलचा १४वा हंगाम सुरू आहे. IPL चे सामने रंगतदार होत आहेत. स्पर्धेतील आठ संघ प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. यामुळेच लढती देखील रंगतदार आणि अखेरच्या षटकारपर्यंत होत आहेत. गेल्या रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढत देखील अशीच चुरशीची झाली. अखेरच्या चेंडूवर चेन्नईने विजय मिळवला. या विजयाने ते गुणतक्त्यात अव्वल स्थानावर गेले तर इकडे भारतात एक जण कोट्यधीश झाला.

आयपीएलमध्ये सामना सुरू होण्याच्या आधी संघ निवडा आणि कोट्यवधी रुपये मिळवा अशी जाहीरात अनेक फॅटसी कंपन्या करत असता. या ड्रीम टीममध्ये संघ निवडून एक सलून चालक कोट्यधीश झालाय.

बिहारमधील मधुबनीतील अंधराठाढी येथील नरौर चौकात सलून चालवणाऱ्या अशोक यांना कधी वाटले देखील नव्हते की त्यांनी निवडलेल्या संघामुळे पैशांचा पाऊस पडले. रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या लढती आधी अशोक यांनी ड्रीम टीम निवडली होती. त्यांनी निवडलेल्या संघातील सर्वच खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केल्याने अशोक यांना १ कोटी रुपयांचे बक्षिस मिळाले.

अशोक यांनी ५० रुपये खर्च करून ११ जणांचा संघ निवडला होता. सामना झाल्यानंतर त्यांना कंपनीकडून १ कोटी रुपये जिंकल्याचा फोन आला. या बक्षिसाच्या रक्कमेतून ३० टक्के कर कापून त्यांना ७० लाख रुपये मिळणार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here