मराठा समाजाला मिळणार इतके टक्के आरक्षण

0

मुंबई,दि.20: विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याबाबतचा कायदा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अधिवेशनाआधी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. सगेसोयरे अंमलबजावणी आधी करावी.

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. मराठा समाजाला राजकीय आरक्षण नसेल असाही प्रस्ताव आहे. मराठा आरक्षण विशेष अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु आहे. मराठा आरक्षण अधिसूचना मसुदा, हरकतींवर बैठकीत चर्चा होतेय. कॅबिनेट बैठकीत मराठा मागास सर्वेक्षण अहवालही सादर होणार आहे.

सामाजिक न्याय विभागाकडे मराठा आरक्षणाबाबत तब्बल साडे चार लाख हरकती आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सध्या सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या हरकतींबाबत अभ्यास सूरू आहे. लवकरच याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे. हरकती नोंदवण्यासाठी सरकारकडून अधिकचा वेळ देण्यात आल्यामुळे विरोधक सध्या या मुद्द्यावर बोलणार नसल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे आजच्या अधिवेशनात हरकतींवर चर्चा होण्याची शक्यता कमीच दिसतेय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here