मनोज जरांगे पाटील यांनी दिले छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर

0

मुंबई,दि.4: मराठा समाजाच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मराठा समाजाने आंदोलन स्थगित केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी अहमदनगरमधील एल्गार सभेत आक्रमक वक्तव्य केले. त्यांना मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिले आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

छगन भुजबळ यांनी तुम्ही गुलाल उधळला, मराठा आरक्षण मिळालं. मग, आता पुन्हा उपोषणाची भाषा कशासाठी करताय, असा सवाल केला होता. यावर एकेरी भाषेत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला आहे. ते मंत्री राहिलेत, त्यांना एवढही कळत नाही का आम्ही गुलाल कशाचा उधळलाय. गेली ७५ वर्षे कायदा बनत नव्हता, आता २००१ च्या कायद्यात मराठे ताकदीने घुसलेत. आम्हाला चॅलेंज करतो, अध्यादेश रद्द होऊ दे मग मंडल आयोगच रद्द करतो, असे म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवर पलटवार केला आहे.

न्हावी समाजातील एका व्यक्तीने ओबीसी आरक्षणासंदर्भात पोस्ट टाकली. त्यामुळे त्यांच्या दुकानात न जाण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला. आता ते जर तुम्हाला बायपास करत असतील तर सर्व न्हाव्यांनी एकही मराठ्याची हजामत करु नका. त्यांना आपआपसात भादरु द्या, असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्याला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिले आहे. मग आम्ही दाढी घरीच करु, असा टोला त्यांनी भुजबळांना लगावला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ते आमची दाढी करणार नसतील तर मग आम्ही दाढी घरीच करु. त्यांना गरीब लोकांना उपाशी मारायचे आहेत. गरीब मेले पाहिजे, हे त्यांचे स्वप्न आहे. ते बारा बलुतेदारांना ओबीसी आरक्षण मिळू देत नाही. आता त्यांना व्यवसाय करु देत नाही. ओबीसींनो लक्षात ठेवा, मराठाच तुम्हाला साथ देणार आहेत. ते तुम्हाला संपवण्यास निघाले आहे. त्यांची साथ देऊ नका, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here