‘माझा उपोषणा दरम्यान मृत्यू झाल्यास मला…’ मनोज जरांगे पाटील

0

जालना,दि.25: ‘माझा उपोषणा दरम्यान मृत्यू झाल्यास मला सागर बंगल्यावर नेऊन टाका’ असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मराठा आंदोलन संपवण्याचा प्रयत्न फडणवीस करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. आंदोलन संपवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची माणसं आहेत. हे सर्व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले.

एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचेही काही चालत नाही. सर्व राज्य देवेंद्र फडणवीसच चालवतात असे जरांगे म्हणाले. संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे पाटील हे शरद पवार यांच्या सांगण्यानुसार आंदोलन करत असल्याचा आरोप केला होता. मी आताच सांगतो मी कोणत्या पक्षाचा नाही. मी कोणत्याही पक्षाचे काम करत नाही. मी समाजाचा आहे. समाज माझ्यासाठी देव आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

विष देण्याचा प्रयत्न आहे

अजय महाराज बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत. अजित पवार यांचे दोन आमदार त्यामध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही लोक हे काम करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवक्ता पण त्यामध्ये आहेत. मी आज टोकाचा निर्णय घेत आहे. मला मारण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. माझे एन्काउंटर करण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. माझा बळी घ्या.

फडणवीसांनी प्रफुल्ल पटेल, भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडली. पवार राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत. भाजपला मोठं करणाऱ्या मुंडेंच्या मुलीची अवस्था वाईट करुन ठेवलीय. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात कटुता निर्माण केलीय. या सर्वामागे फडणवीसच असल्याचा जोरदार हल्लाबोल जरांगे पाटलांनी केला. 

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. फडणवीसांनी मला रोखून दाखवावं. मी मेल्यावर माझा मृतदेह सागर बंगल्यावर टाका, असे आवाहन जरांगेनी केलंय. फडणवीसांनी आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करु नये, असेही ते म्हणाले. आपण फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणार असल्याचे ते म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here