सोलापूर,दि.२७: Manoj Jarange On Cm Devendra Fadnavis: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आझाद मैदान मुंबई येथे २९ अॅागस्टपासून उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते. मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरीवर नतमस्तक झाले. किल्ले शिवनेरीची माती आपल्या कपाळी लावली. (Manoj Jarange Marathi News)
हेच मराठे तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा… | Manoj Jarange On CM Devendra Fadnavis
“मी कालही सांगितलं, आजही पवित्र भूमितून विनंती करून सांगतो की, फडणवीसजी, तुम्हाला ही योग्य संधी आहे; संधीचं सोनं करायची. गोरगरीब मराठ्यांची मनं जिंकायची. तुम्ही मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. हेच मराठे तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा मरेपर्यंत उपकार विसरणार नाहीत”, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी मांडली.

“तु्म्ही काही आमचे वैरी नाहीत. तुम्ही काही आमचे शत्रू नाहीत. तुम्ही फक्त तुमची मराठाविरोधी आडमुठी भूमिका सोडून द्या. मोकळ्या मनाने वागायला सुरूवात करा. आम्ही फक्त आरक्षणासाठी तुमच्याशी भांडतोय. तेही लोकशाही मार्गाने. आम्ही दिलेला शब्द कधीही बदलणार नाही. तुम्हाला संधी आली आहे, तिचं सोनं करा”, असे मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी मिळाली असली तरी जरांगे पाटील यांनी मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक सहभागी झाले असून, आमदार आणि खासदारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.