शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या

0

खोपोली,दि.२६: नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

आज (दि.२६) सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी मंगेश काळोखे गेले होते. मुलाला शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परतत असताना, वाटेत दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. एका काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार जणांनी काळोखे यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर हल्ला केला. मंगेश काळोखे यांना काही कळण्याच्या आताच, हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले.

खोपोलीतील जया बारजवळ तलवार आणि चॉपरने वार करून मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. राजकीय वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here