सोलापूर,दि.१३: लग्नाचे आमिष दाखवुन अत्याचार केल्याप्रकरणी व्यवस्थापकास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यात आरोपी अजित आप्पासाहेब पाटिल रा. सोलापूर या व्यवस्थापकास मुलीस लग्नाचे आमिष दाखवुन अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी रुपये ५०,००० च्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर केला.
यात हकिकत अशी की, फिर्यादी सोलापुर येथील एका महाविद्यालयात बी.बी.ए. मध्ये शिकत असताना तिची व आरोपी यांची मैत्री झाली. त्यानंतर एक दिवस आरोपीने फिर्यादीस प्रेम प्रस्ताव दिला पण फिर्यादीने तो स्विकारला नाही. परंतु आरोपीने फिर्यादीस लग्नाचे वचन दिले त्यामुळे फिर्यादीने त्यास होकार दिला. आरोपीने फिर्यादीस लग्नाचे वचन देवुन सोलापुर पुणे रोड वरील लॉजवर नेले व तिथे फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध केले.
व त्यानंतर अनेकवेळा आरोपीने फिर्यादीस लग्नाचे वचन देवुन शरीरसंबंध ठेवले. मग त्यानंतर फिर्यादीचे घरच्यांनी फिर्यादीचे लग्नासाठी मुलगा पाहणे सुरु केले त्यावेळी फिर्यादीने आरोपीस लग्नाबाबत विचारणा केली असता, आरोपीने त्याला नकार दिला. अशा आशयाची फिर्याद विजापुर नाका पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती.
त्यानुसार पोलीसांनी आरोपीस ०४/१०/२०२३ रोजी अटक केली होती. यातील आरोपी अजित आप्पासाहेब पाटिल याने जामीन मिळणेकामी अॅड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापुर येथील सत्र न्यायालय येथे जामीनासाठी अर्ज दाखल केला.
यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर पीडितेचे वय पाहता तिस फूस लावण्याचा संबंध येत नाही. तसेच सदर आरोपी व पिडीता यांचे एकमेकांच्या सहमतीने प्रेम संबंध होते. तसेच सदर पिडीता ही उच्चशिक्षित असुन सदरचा प्रकार हा गेली ४ वर्षापांसुन चालु असुन त्यास बलात्कार म्हणता येणार नाही. सदरचा प्रकार निव्वळ प्रेम संबंधातून झालेला आहे, असा युक्तीवाद आरोपीतर्फे करण्यात आला. त्यापोटी आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले.
सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायाधीश यांनी आरोपी नामे अजित आप्पासाहेब पाटिल रा. सोलापुर याची जामीनावर मुक्तता केली. यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. मयुरेश शिंदे, अॅड. संतोष आवळे, अॅड. राम शिंदे, अॅड. फैय्याज शेख, अॅड. सुमित लवटे, अॅड. शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.