निवडणूक प्रचारादरम्यान मोठा अपघात, कारला धडक दिल्याने भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

0

बेंगळुरू,दि.9: केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान बेंगळुरूमध्ये मोठा अपघात झाला. या अपघातात स्कूटरस्वाराचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती हा भाजपचा कार्यकर्ता असून तो निवडणूक प्रचारातही सहभागी होता.

प्रचारादरम्यान शोभा करंदलाजे यांच्या कारचा दरवाजा उघडा असताना एका स्कूटरने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. कारला धडक दिल्यानंतर स्कूटर चालवत असलेले प्रकाश खाली पडले आणि बसने चिरडले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी केआर पुरम भागात ही घटना घडली. शोभा करंदलाजे बेंगळुरू उत्तर मतदारसंघातून उमेदवार असून त्या परिसरात प्रचार करत होत्या. अपघात झाला तेव्हा त्या कारमध्ये बसल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, करंदलाजे यांच्या वाहन चालकाने दुसऱ्या बाजूने वाहन येत असल्याचे न पाहता कारचा दरवाजा उघडला, त्यामुळे स्कूटर चालवत असलेले प्रकाश उघड्या दरवाजाला धडकून जमिनीवर पडले. त्याचवेळी पलीकडून येणारी बस त्यांच्या अंगावर गेली, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश हे 63 वर्षांचे होते.

या प्रकरणी पोलिसांनी कार आणि बस चालक दोघांविरुद्ध भादंवि कलम 304 आणि 283 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत बोलताना शोभा करंदलाजे म्हणाल्या की, आमचे कार्यकर्ता प्रकाश यांचा अपघात झाला. आम्ही रॅलीसाठी आलो होतो. गाडी रस्त्याच्या शेवटी उभी होती. ते आले आणि कारला धडकले आणि खाली पडले. यानंतर एक बस त्यांच्या अंगावरून गेली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here