Vijay Wadettiwar: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य चर्चेत

0

मुंबई,दि.१९: Vijay Wadettiwar: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य चर्चेत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी मी मुळात पूर्वीचा शिवसैनिक आहे, असं वक्तव्य केलं. तसेच शिवसैनिक असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. ते शुक्रवारी (१८ ऑगस्ट) मातोश्रीवर जाऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

Vijay Wadettiwar: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य चर्चेत

विजय वडेट्टीवार म्हणाले, “ही माझी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरची पहिली भेट नाही. यापूर्वीही माझी आणि त्यांची भेट झालेली आहे. विरोधी पक्षनेता झाल्यावर मातोश्रीवरील ही पहिली भेट आहे. मी सदिच्छा भेट म्हणून येथे आलो. अशा भेटीत अनेक विषयांवर चर्चा होत असते. आजच्या भेटीला फार राजकीय स्वरुप नव्हतं.”

मी मुळात पूर्वीचा शिवसैनिक

“बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून जुन्या आठवणी, किस्से यावर बरीच चर्चा झाली. कारण मी मुळात पूर्वीचा शिवसैनिक आहे. त्यावेळी मी मातोश्रीवर अनेकदा आलो होतो. कोकणापासून गडचिरोलीपर्यंत, १९९० मध्ये झालेल्या निवडणुका, १९९५ मध्ये झालेल्या निवडणुका, १९९० मध्ये झालेली युती, त्यावेळची भाजपाची स्थिती यावरही चर्चा झाली,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

भाजपाच्या लोकांना बसायला खुर्चीही…

“पहिल्यांदा युती झाली त्यावेळी राज्यात भाजपाच्या लोकांना बसायला खुर्चीही देत नव्हते. बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई की त्यांना बसायला खुर्ची मिळायला लागली. अशी सर्व चर्चा मातोश्रीवरील भेटीत झाली,” असंही विजय वडेट्टीवारांनी नमूद केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here