Sharad Pawar On NCP: अजित पवारांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया म्हणाले…

0

मुंबई,दि.२: Sharad Pawar On NCP: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मंत्रिपदाची शपथ घेत राज्यातील राजकारणात मोठा भूकंप केला. अजित पवारांसोबत छगन भुजबळ व इतर आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह ८ राष्टावादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळातून उलट-सुलट प्रतिक्रीया येत आहेत. या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली. यावेळी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानून टोला लगावला. (Sharad Pawar On NCP)

काय म्हणाले शरद पवार? Sharad Pawar On NCP

शरद पवार म्हणाले, दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी एक वक्तव्य केले होते. ते काँग्रेस पक्षाच्या विरोधात होते. त्यानंतरचे राष्ट्रवादी बद्दलचे होते. राष्ट्रवादी पक्ष हा भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगत असताना त्यांनी राज्य सरकारची रँक याचा उल्लेख केला आणि त्याबरोबर इरिगेशनमध्ये जी काही तक्रार होती त्यासंबंधीचा उल्लेख केला. त्यात त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सहभागी आहे, असा उल्लेख केला. मला आनंद आहे, आज त्यांनी राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना शपथ दिली. म्हणजे मोदींनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते. या आरोपातून या सर्वांना मुक्त केले, या बद्दल पंतप्रधानांचा आभारी आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला. 

‘या सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. उद्याच्या सहा तारखेला मी राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलविली होती. त्यात मी पक्षाच्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित केले गेले होते त्याबद्दल बोलणार होतो. यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि आम्हीच पक्ष आहोत असे म्हणत शपथ घेतलेली आहे. 

पक्षाचे काही सदस्य विधिमंडळाचे याचे चित्र काही दिवसांत समोर येईल. ज्यांची नावे आली त्यापैकी काही लोकांनी मला फोन करून आमची सही घेतली, पण आमची भूमिका वेगळी आहे, असे सांगितले आहे. मी आत्ताच काही बोलू इच्छित नाही. याचे स्वच्छ चित्र माझ्याएवढेच जनतेसमोर मांडण्याची अपेक्षा आहे, तसे त्यांनी केले तर माझा विश्वास बसेल, असंही पवार म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here