पुणे,दि.30: 95 वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर महात्मा फुले वाडा येथे गुरुवारपासून आत्मक्लेश उपोषण आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी आढाव यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
ईव्हीएम घोटाळ्या प्रकरणी शरद पवार म्हणाले की ते दिसतंय पण त्याचा पुरावा नाही. ईव्हीएम हॅक होऊ शकतं याचे सादरीकरण आम्हाला दिलं होतं पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. निवडणूक आयोग इतकी टोकाची भुमिका चुकीची घेईल असे आम्हाला वाटले नव्हते. शेवटच्या तासाभरातली जी आकडेवारी आलेली आहे.
आधी विश्वास नव्हता पण…
शेवटच्या तासाभरातली जी आकडेवारी आलेली आहे, ती धक्कादायक प्रकारची अशी आहे. काँग्रेस कार्यकारीणीत या विषयी चर्चा झाली. आणि एकत्रित बसून इंडिया आघाडीने हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. सोमवारी या वर निर्णय होईल. 15 टक्के मतं वाढवली गेली यावर शरद पवार म्हणाले की आधी विश्वास नव्हता पण आता त्यात प्राथमिकदर्शी तथ्य असावं असं दिसतंय, असे शरद पवार म्हणाले.