खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप म्हणाले ‘निवडणुकांपूर्वी तुरुंगातल्या कैद्यांना…’

0

मुंबई,दि.१२: खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचा उल्लेख करत गंभीर आरोप केलाआहे. तुरुंगात कैद असलेल्या काही मोठ्या गुन्हेगारांना आगामी निवडणुकांच्या आधी बाहेर काढण्याचं षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केले आहेत. खासदार राऊत म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालय तुरुंगात असलेल्या अनेक मोठ्या गुन्हेगारांच्या संपर्कात आहे. यात ३०२ कलमाअंतर्गत कैद असलेल्या कैद्यांपासून अनेक मोठमोठ्या आरोपींचा समावेश आहे. मुंबईपासून नाशिक, कोल्हापूरपर्यंत राज्यातल्या वेगवेगळ्या तुरुंगात कैद असलेल्या कैद्यांशी संपर्क साधला जात आहे.

काय म्हणाले खासदार संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले, तुरुंगात कैद असलेल्या गुन्हेगारांबरोबर मुख्यमंत्री कार्यालय वाटाघाटी करत आहे. सत्तेत सहभागी असलेले लोक त्यांच्या संपर्कात आहेत. तुरुंगात कैद्यांपर्यंत मोबाईल पोहोचवण्यात आले असून त्यावरून संपर्क साधला जात आहे. हे सगळं मुख्यमंत्री कार्यालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. लवकरच याबाबतची माहिती मी लोकांसमोर घेऊन येईन. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावं. ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. परंतु ते त्यांचं फ्रस्ट्रेशन (निराशा) महाराष्ट्रावर काढत आहेत. यामुळे केवळ राज्याचं नुकसान होणार आहे. राज्यातलं सरकार दाऊद इब्राहिमच्या टोळीसारखं काम करत आहे.

संजय राऊत म्हणाले, काही गुन्हेगारांना निवडणुकीपूर्वी तुरुंगातून बाहेर काढण्याचं षडयंत्र सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून या कैद्यांशी वाटाघाटी सुरू आहेत. मी लवकरच याचे पुरावे देईन. अनेक मोठ्या गुन्हेगारांबरोबर या वाटाघाटी सुरू आहेत. निवडणुकीआधी काही कैद्यांना जामीन देऊन तुरुंगातून बाहेर काढण्याचं षडयंत्र रचलं आहे. हे षडयंत्र कोणाविरोधात आहे, याची माहिती आणि पुरावे मी लवकरच तुमच्यासमोर मांडेन.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here