“चार जून पर्यंत तुम्हाला भक्त अशा अवस्थेत दिसतील..” आमदार रोहित पवार

0

सोलापूर,दि.19: महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात तर देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. उद्या (दि.20) पाचव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होत आहे. भाजपाने या निवडणुकीत ‘अब की बार चारसौ पार’ अशी घोषणा दिली आहे. तर ठाकरे गटासह विरोधी पक्षांनी ‘अब की बार भाजपा तडीपार’ अशी घोषणा दिली आहे.

भाजपाचे कार्यकर्ते प्रचारात ‘अब की बार चारसौ पार’ घोषणा देत प्रचार करत आहेत. भाजपाच्या प्रचारात हीच महत्वाची घोषणा आहे. अशातच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. “चार जून पर्यंत तुम्हाला भक्त अशा अवस्थेत दिसतील..” असे रोहित पवारांनी ट्विट केले आहे.

प्रत्येक पक्षाच्या स्वत:च्या घोषणा आहेत. या घोषणांनी कार्यकर्त्यांना उत्साह चढतो. अनेक कार्यकर्ते दिवसभर याच घोषणा देत असतात. पण सतत हाच विचार केल्याने याचे दुष्परिणामही जाणवू शकतात. याचीच प्रचिती देणारा एक कथित व्हिडीओ समोर आला आहे. 

रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओ

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते रोहीत पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. या कथित व्हिडीओमध्ये एक रुग्ण डॉक्टरकडे जाताना दिसत आहे. तो केवळ एकच वाक्य बोलतोय. ‘इस बार चारसो पार’ या वाक्याव्यतिरिक्त त्या रुग्णाला दुसरं काही बोलता येत नाहीय. त्याच्या सोबत असलेला सोबती काही होणार नाही म्हणत त्याला दिलासा देतोय. 

आधी हे अच्छे दिन आयेंगे असे म्हणायचे..आता हे इस बार चारसो पार असे म्हणत आहेत. दरम्यान डॉक्टर त्यांची नस तपासताना दिसत आहेत. त्यानंतर डॉक्टर रुग्णाला एक इंजेक्शन देतात. त्यानंतर हा रुग्ण शेवटचं ‘इस बार चारसो पार’ बोलून शांत होताना दिसतो.. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here