Deepak Kesarkar: ‘एक ना एक दिवस उद्धव ठाकरेंना याची जाणीव होईल, आपण काय…’: दीपक केसरकर

Deepak Kesarkar: दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे

0

मुंबई,दि.22: Deepak Kesarkar On Uddhav Thackeray: शिंदे गटाचे (Shinde Group) नेते शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेवर दावा सांगितला आहे. उद्धव ठाकरे यांचा 23 जानेवारी रोजी पक्षप्रमुख पदाची मुदत संपत असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता पुढे काय? असा प्रश्न अनेकांना पडलाय. दरम्यान, त्यांनी पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्या अशी मागणी केल्याची माहिती समोर आली होती. यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देत जोरदार टोला लगावला.  

एक ना एक दिवस त्यांना याची जाणीव… | Deepak Kesarkar On Uddhav Thackeray

“ही त्यांची धडपड आहे. खरंतर याचा विचार त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाताना करायला हवा होता. पण अजूनही त्यांना कळत नाहीये की राष्ट्रवादी त्यांना संपवायला निघाली आहे,” असं केसरकर म्हणाले. “खऱ्या अर्थानं आम्ही शिवसेना जीवंत ठेवली आहे, बाळासाहेबांचे विचार जीवंत ठेवले आहेत. एक ना एक दिवस त्यांना याची जाणीव होईल. आपण राष्ट्रवादीच्या जाळ्यात फसून काय गमावलं याचीही जाणीव होईल,” असंही ते म्हणाले. 

हेही वाचा PM नरेंद्र मोदींवरील ‘बीबीसी’चा माहितीपट यूट्यूब आणि ट्विटरवर ब्लॉक

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray
दीपक केसरकर

30 जानेवारी रोजी धनुष्यबाण कोणाला दिला जाईल याचा निकाल आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मला विश्वास आहे निकाल आमच्या बाजूनं लागेल,” असं केसरकर म्हणाले. 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वादानंतरची संत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ही सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे (Shinde Vs Thackeray) यांच्यातील सत्तासंघर्षाचा फैसला 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे (Supreme Court) जाणार की नाही, याचा फैसला आता 14 फेब्रुवारीला होणार आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया | Maharashtra Politics

त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कसा सुटणार याचा निर्णय पुढील महिन्यात होणार आहे. दरम्यान घटनेवर आमचं प्रेम आहे, घटनापीठ सलग सुनावणी घेईल, व्हलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे, सगळं प्रेमानं होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here