Uday Samant: आता मंत्री उदय सामंतही नॉट रिचेबल, एकनाथ शिंदे गटात सामिल होणार!

0

मुंबई,दि.26: Uday Samant: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे अनेक आमदार गेले आहेत. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढत आहे. शनिवारपर्यंत शिवसेना बंडखोरांवर कारवाई करण्यासाठीच्या बैठकीत उपस्थित राहणारे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतही (Uday Samant) आता नॉट रिचेबल आहेत. आज सकाळपासून उदय सामंत नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. उदय सामंतदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. आज सकाळीच उदय सामंत सूरतला गेले असल्याचे म्हटले जात आहे.

बंड केलेल्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून पावले उचलली जात आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेतून होणारी आमदारांची गळती थांबण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. एकनाथ शिंदे गटाने 40 शिवसेनेचे 40 आमदार आणि इतर अपक्षांसह जवळपास 50 आमदारांचा गट तयार केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सध्या गुवाहाटीमध्ये थांबले आहेत. आता या फुटीर आमदारांच्या यादीत उदय सामंत यांचेही नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार आहेत. कोकणातील दीपक केसरकर यांनीदेखील पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. त्याशिवाय, रायगडमधीलही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here