Maharashtra News: देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विद्यमान सरकार कोसळेल म्हणून २२ आमदार ठेवलेत तयार

0

औरंगाबाद,दि.५: Maharashtra News देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील विद्यमान सरकार कोसळेल म्हणून २२ आमदार तयार ठेवलेत असा दावा शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेला संघर्ष, सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका यासह नाराजीच्या कारणांवरुन विद्यमान शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळेल, असे दावे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केले जात आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांनीही याबाबत अनेक भाकिते केली आहेत. मात्र, यातच आता शिंदे सरकार कोसळेल म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. (Maharashtra News)

शिवसेना (ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी याबाबत गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील २२ नाराज आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. हे २२ आमदार कुठले आणि कोण आहेत, यासंदर्भात चंद्रकांत खैरे यांनी सांगितले नाही. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पराभव होईल. छगन भुजबळ, नारायण राणे पडले. मग एकनाथ शिंदेही निवडणुकीत पडणार. फक्त एकनाथ शिंदेच नाही, तर शिंदे गटातील सर्वचे सर्व ४० आमदारांचा पराभव होईल, असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला. 

देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवले २२ आमदार

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटातील १६ आमदार हे अपात्र ठरू शकतात. हे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडू शकते. हे १६ आमदार अपात्र ठरल्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याचा प्लॅनही देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवला आहे. फडणवीस हुशार माणूस आहे. त्यांनी दुसरीकडे काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असा मोठा दावा खैरे यांनी केला आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे ते सध्या शांत आहेत, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, सिल्लोडमध्ये आमची खूप ताकद आहे. अब्दुल सत्तार आमच्या ताकदीने निवडून आले. तुम्ही खैरेंना सोबत घेऊन चला, असे म्हणत उद्धव ठाकरेंना हात जोडले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दोघांचे हात धरून वर केले आणि सांगितले की, निवडून आणायचे. आणि लोकांनी मतदान केले. त्यावेळेस हे त्यांनी मान्य केले. नंतर आता मान्य करायला तयारी नाही. सत्तार सरडा आहे, सगळीकडे फिरतो, अशी घणाघाती टीका खैरे यांनी केली. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here