महाराष्ट्राचा पहिला एक्झिट पोल समोर, महायुतीला इतक्या जागांचा अंदाज 

0

मुंबई,दि.20: महाराष्ट्रात आज (दि.20) विधानसभेसाठी मतदान झाले. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्याअगोदर एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा? यांची आकडेवारी समोर आली आहे. राज्यात 288 जागांवर मतदान झाले. राज्यभरात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 58.22  टक्के मतदान झाले. 

महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान संपले आहे, तर दुसरीकडे झारखंडमध्येही दुसऱ्या टप्प्यातील ३८ जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ५८.२२ टक्के मतदान झाले. त्याचवेळी झारखंडमधील मतदारांमध्ये विलक्षण उत्साह दिसून येत असून, तेथे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७.५९ टक्के मतदान झाले.

दोन्ही राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया संपली आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये उमेदवारांचे भवितव्य सील झाले आहे. दोन्ही राज्यांतील निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला येतील, मात्र त्यापूर्वीच एक्झिट पोलचे निकाल आले आहेत.

MATRIZE चा एक्झिट पोल समोर आला आहे. यामध्ये महायुतीला 150-170, MVA 110-130 आणि इतरांना 8-10 जागा मिळण्याची शक्यता आहे.

चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 152 ते 160 जागा मिळतील, एमव्हीए आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील, तर इतरांना 6 ते 8 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीत लढत

महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती (भाजप, शिंदे गट, अजित गट) आणि विरोधी एमव्हीए आघाडी (उद्धव गट, शरद पवार गट आणि काँग्रेस) यांच्यात लढत आहे. महाआघाडीत भाजप १४९, शिवसेना ८१ तर अजित पवार यांची राष्ट्रवादी ५९ जागांवर निवडणूक लढवत आहे. तर MVA मध्ये काँग्रेसने 101 जागांवर, शिवसेनेने (UBT) 95 जागांवर आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने 86 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्राच्या लढाईत बहुजन समाज पक्ष आणि एआयएमआयएमसह छोटे पक्षही आहेत. बसपने 237 तर AIMIM ने 17 उमेदवार उभे केले आहेत. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here