रस्त्यावर असताना एक बोलावं लागतं आणि आत गेल्यावर एक, असं सर्व काही असतं : महादेव जानकर

0

बुलडाणा,दि.22: सत्तेत असताना पक्षाचे वेगळे धोरण असते आणि विरोधी पक्षात असताना त्याबाबत वेगळं धोरण असते हे अनेकांना माहीत आहेच. मात्र भाजपचा मित्रपक्षाचे नेते रासपचे नेते महादेव जानकर ( mahadev jankar ) यांनी एसटी संपावरून भाजपला घरचा अहेर दिला आहे. एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीगीकरण करून घेण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप (ST bus strike ) सुरूच आहे. भाजपचे नेत्यांनी या आंदोलनाची कमान आपल्या हाती घेतली आहे. तर दुसरीकडे, ‘आमचं सरकार असताना कुठे एसटीचे विलीनीकरण झालं’ असं महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांचे बुलडाण्यात आंदोलन झाल्यानंतर तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जानकर शनिवारी (दि.20) बुलडाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. विशेष म्हणजे भाजपचे नेत्यांनी एसटी कर्मचारी आंदोलनाची कमान आपल्या हाती घेतली आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचारी काही दिवसांपासून संपावर आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष एसटी कर्मचाऱ्यांच्या आणि राज्य शासनाच्या निर्णयाकडे लागून आहे. विरोधी पक्ष नेते, सत्ताधारी एकमेकांवर टीकास्त्र सोडत असतानाच आता रासपचे नेते तसेच माजी मंत्री महादेव जानकर यांनी एक वक्तव्य केलंय.

‘आमचे सरकार असताना कुठं विलीनीकरण झालं होतं, रस्त्यावर असताना एक बोलावं लागतं आणि आत गेल्यावर एक, असं सर्व काही असतं. त्यामुळे हा सिस्टीमचा भाग आहे, जनतेनं हुशार झाल पाहिजे, हाच एक त्यावरचा पर्याय आहे , असं वक्तव्य जाणकारांनी केलं. जानकर यांच्या या विधानामुळे नवीन वाद उभा राहण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here