दि.8: Mahabharat Bheem Praveen Kumar Sobti: टेलिव्हिजन जगतातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. बीआर चोप्रा यांच्या प्रसिद्ध मालिका महाभारतात भीमाची भूमिका साकारणारे उत्तम अभिनेते प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti) यांचे निधन झाले आहे. प्रवीण यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला. प्रवीण कुमार यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रवीण कुमार सोबती यांचे दिल्लीत निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज पंजाबी बाग येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रवीण कुमार यांनी चित्रपटांमध्ये काम केले
महाभारत मालिकेव्यतिरिक्त प्रवीण कुमारने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केले आहे. पण महाभारत मालिकेत भीमाची भूमिका साकारून ते घराघरात प्रसिद्ध झाले. भीमाच्या व्यक्तिरेखेतील भूमिका खूप आवडली होती. प्रवीण यांच्या निधनाच्या बातमीने त्यांचे चाहते दु:खी झाले आहेत.
ऑलिम्पिक स्पर्धेतही भाग घेतला
प्रवीणकुमार सोबती यांनी दोनदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी अनेक सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली होती. क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 1967 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. क्रीडा क्षेत्रातील यशस्वी कारर्कीदीनंतर्र प्रवीण यांनी 70 च्या दशकाच्या उत्तरार्धात अभिनय क्षेत्रात कारकीर्द सुरू केली. त्यांची पहिली भूमिका रविकांत नागाईच दिग्दर्शित चित्रपटात होती, ज्यात त्यांच्या वाट्याला एकही संवाद नव्हते.
1981 मध्ये आलेल्या ‘रक्षा’ चित्रपटात प्रवीण यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. अमिताभ बच्चन यांच्या ‘शहेनशाह’ चित्रपटात त्यांनी ‘मुख्तार सिंग’ची अफलातून भूमिका साकारली होती.
करिश्मा कुदरत का, युद्ध, जबरदस्त, सिंहासन,खुदगर्ज, लोहा, मोहब्बत के दुश्मन, इलाका आणि इतर अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या आहे. पण त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेने.
प्रवीणकुमार यांचे अखेरचे दिवस अडचणीत गेले
महाभारतातील भीम प्रवीणकुमार यांचे शेवटचे दिवस संकटात गेले. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक संकटाचा सामना करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण हे अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात होते आणि त्यांनी सरकारकडे मदतीचे आवाहनही केले होते.
प्रवीण यांनी अशी केली अभिनयाची सुरुवात
प्रवीणने 100 रुपये घेऊन आपल्या अभिनयातील नशिबाचे दार उघडले होते. प्रवीण त्यावेळी ग्वाल्हेरमध्ये बीएसएफमध्ये होते. येथूनच त्यांच्या मनात करिअर बदलण्याचा विचार आला. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी त्यांना आणखी काही काम करायचे होते आणि काही काळानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, जेव्हा त्यांना चित्रपटाची ऑफर आली. एक उत्कृष्ट अभिनेता आणि क्रीडा व्यक्ती प्रवीण आज आपल्यात नाही. प्रवीण यांच्या निधनाने सर्वांनाच दुःख झाले आहे.