बारामती,दि.१२: घराच्या छपरावर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी केले आहे.
सुनिल पावडे म्हणाले, वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवूनदेणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे.
रूफ टॉप सोलर सिस्टिमसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला एककिलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपयेव तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळते. वीजग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे.
महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिमबसविण्यासाठी महावितरण मदत करते. ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवरऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचेमोबाईल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटीघरांसाठी ही योजना सुरू केलेली असून राज्यातील ग्राहकांनीयोजनेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा.
एक किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारेचार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिनादीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोनकिलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोनते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते.
घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवूनसौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरीवापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिलशून्य येते अर्थात वीज मोफत मिळते व जास्तीची वीजमहावितरणला विकून उत्पन्नही मिळते.