Lucky Oberoi: आम आदमी पार्टीचे नेते लक्की ओबेरॉय यांची गोळ्या झाडून हत्या

0

मुंबई,दि.६: आम आदमी पार्टीचे नेते लक्की ओबेरॉय (Lucky Oberoi) यांची हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील जालंधर येथे आम आदमी पक्षाचे नेते लकी ओबेरॉय यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मॉडेल टाउनमधील गुरुद्वारा साहिबच्या बाहेर घटना घडली. हल्लेखोरांनी लकी ओबेरॉय यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली. लकी यांना ५ गोळ्या लागल्या. गोळीबारानंतर त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, लक्की ओबेरॉय हे दररोजप्रमाणे मॉडेल टाऊनमधील गुरुद्वारा साहिबमध्ये दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शन घेऊन ते पार्किंगमध्ये उभी असलेल्या त्यांच्या ‘थार’ कारमध्ये बसले. तितक्यात दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंधाधुंध गोळीबार केला. त्यांच्या शरीरात सुमारे पाच गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शहरातील अनेक राजकीय नेते आणि समर्थक रुग्णालय आणि घटनास्थळी धावले. एडीसीपी जयंत पुरी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.

पोलीस जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासत आहेत आणि हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. परिसरात दहशतीचे वातावरण आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here