PM Kisan : पीएम किसान (PM Kisan) सन्मान निधी योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना ही रक्कम (PM Kisan) मिळणार आहे त्याची बेनिफिशियरी लिस्ट केंद्र सरकारने जारी केली आहे. मीडिया अहवालांच्या मते, यावेळचा हप्ता 15 ते 25 डिसेंबरदरम्यान केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. केंद्र सरकारने याकरता योजनाही आखली आहे. तुम्ही देखील या लिस्टमध्ये तुमचं नाव तपासू शकता.
पीएम शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार पीएम शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये पाठवते. आतापर्यंत या योजनेचे नऊ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे या योजनेचं उद्दिष्ट्य आहे. ही योजना 2019 मध्ये मोदी सरकारने सुरू केली होती. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर वर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. या योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता असतो. छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर आहे.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेअंतर्गत पैसे हस्तांतरित केले होते. आतापर्यंत, सरकारने देशातील 11.37 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 1.58 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली आहे. आता दहाव्या हप्त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची यादीही प्रसिद्ध झाली आहे.
असे तपासा तुमचे नाव
-याकरता शेतकऱ्यांना http://pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
-त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’ (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी देखील करू शकता.
-याठिकाणी या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव तुम्हाला सहजरित्या मिळू शकेल. सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी या वेबसाइटवर अपलोड केली आहे. याठिकाणी तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे देखील समजेल. यासंदर्भातील माहिती तुम्ही किसान आधार नंबर/अकाऊंट नंबर आणि मोबाइल नंबरच्या माध्यमातून देखील मिळवू शकता.
-‘फार्मर कॉर्नर’वर जाऊन Beneficiary Status च्या लिंकवर क्लिक करा.
-याठिकाणी तुम्हाला आधार नंबर, अकाउंट नंबर आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल.
-याठिकाणी सरकार लाभार्थ्यांची पूर्ण यादी देखील अपलोड करते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे आधार, बँक डिटेल्स आणि मोबाइल नंबरच्या साहाय्याने माहित करुन घेऊ शकता. तुम्ही मिळणाऱ्या हप्त्याचं स्टेटस देखील अशाप्रकारे जाणून घेऊ शकता.