संजय राऊत यांना एकनाथ शिंदेंनी पाठवली कायदेशीर नोटीस

0

मुंबई,दि.29: दैनिक सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. दैनिक सामनातून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर लोकसभा निवडणुकीत करोडो रूपये वाटल्याचा आरोप केला होता. एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला होता. 

दैनिक सामनातून संजय राऊत यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. पण या आरोपांवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एकनाथ शिंदेंनी पाठवलेली नोटीस शेअर केली आहे. मात्र, चोराच्या उलट्या बोंबा म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या नोटीसची खिल्ली उडवलीये. मजेशीर राजकीय पत्र असा उल्लेख करत राऊतांनी एकनाथ शिंदेंना डिवचलंय. 

संजय राऊत यांना एकनाथ शिंदेंनी पाठवली कायदेशीर नोटीस

तीन दिवसात माफी मांगा अन्यथा कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटले असा आरोप सामनातून करण्यात आला होता. संजय राऊत यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर मानहानीचा दावा करणारा खटला दाखल केला जाईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here