Latur ST Bus Accident: एसटी बसला भीषण अपघात, 30 प्रवासी जखमी

0

लातूर,दि.17: Latur ST Bus Accident: लातूरमध्ये एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात (ST Bus Accident) झाला आहे. लातूरहून पुणे-वल्लभनगरकडे जाणाऱ्या एसटी बसचा बोरगाव काळे नजीक रॉड तुटल्याने बस पुलावरून खाली घसरल्याची घटना मंगळवारी (दि.17) सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एसटीतील 30 प्रवाशी जखमी झाले आहेत. यापैकी 14 प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने लातूरला हलवण्यात आले आहे.

कसा झाला अपघात? | Latur ST Bus Accident

या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, जखमींची संख्या मोठी आहे. लातुर-पुणे-वल्लभनगर ही एसटी निलंगा आगारातून निघाली. आज सकाळी ही बस पुण्याच्या दिशेने जात होती.

Latur ST Bus Accident
लातूर एसटी बस अपघात

एमएच 20 बीएल 2372 क्रमांकाची एसटी बस पुणे-वल्लभनगरसाठी निघाली होती. ही बस बोरगाव काळे नजीक आली असता अचानक स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस पुलाच्या खाली घसरली. या अपघातात बसमधील 30 प्रवासी जखमी झाले असून, प्रत्यक्षदर्शीनी तात्काळ 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधून जखमींना उपचारासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून 16 जणांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

चालकाच्या डोक्याला दुखापत | Latur Accident

दरम्यान, बस पुलाखाली घसरल्याने बसच्या समोरील बाजू मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली. यामध्ये चालकाच्या डोक्याला दुखापत झाली असून, इतर प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे लातूर वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here