Lata Mangeshkar: लता मंगेशकरांची तब्येत पुन्हा बिघडली, व्हेंटिलेटरवर ठेवले

0

मुंबईदि.५: लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुन्हा कृत्रिम श्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले आहे. ८ जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ९२ वर्षीय लतादीदी आयसीयूमध्ये होत्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी इस्पितळात गेले आहेत. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतित समधानी यांनी सांगितले की, लतादीदींची प्रकृती पुन्हा एकदा खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर २४ तास लक्ष ठेवून आहे.

पाच दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते की, ‘मी लताजींवर उपचार करणार्‍या डॉक्टरांशी बोललो. त्या बऱ्या होत आहेत. त्यांनी कोरोना आणि न्यूमोनियावर मात केली आहे. त्या पहिल्यांदा व्हेंटिलेटरवर होत्या. पण आज त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले. आता त्यांना फक्त ऑक्सिजन दिला जात आहे. लतादीदींनी डोळे उघडले असून त्या डॉक्टरांशीही बोलत आहेत. कोरोनामुळे त्या थोड्या अशक्त झाल्या आहेत, पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.’


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here