Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतला मोठा निर्णय

0

दि.6: Lata Mangeshkar: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली देत मोठी घोषणा केली आहे. लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी पश्चिम बंगालमध्ये सार्वजनिक ठिकाणी पुढील 15 दिवस वाजणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. संगीत क्षेत्रात लता मंगेशकर यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना अनोखी मानवंदना देण्याच्या दृष्टीनं ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. 

हेही वाचा Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांनी या कारणामुळे मोहम्मद रफी यांच्यासोबत गाणे केले होते बंद



राज्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच कार्यालयं, कार्यालयांच्या लिफ्ट, ट्राफिक सिग्नल अशा ठिकाणी लता मंगेशकर यांची गाणी लावली जाणार आहेत. तसंच पश्चिम बंगालमध्ये उद्याचा सर्व शासकीय कार्यालयांना ‘हाफ डे’ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयं उद्या अर्धा दिवसच कामकाज केलं जाणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here