Lata Mangeshkar Shahrukh Khan: शाहरुख खानने लताजींसाठी केलेली प्रार्थना आणि फुंकण्यामागे ही इस्लामिक परंपरा आहे

0

दि.7: Lata Mangeshkar Shahrukh Khan: सर्वांच्या लाडक्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले. लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शांतता पसरली आहे. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) जवळपास महिनाभरापासून आजारी होत्या. त्यांच्यावर शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अभिनेता शाहरूख खान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ले जा मेरी दुआएं, परदेस जाने वाले… दिलीप कुमार आणि नर्गिसच्या ‘दीदार’ चित्रपटासाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी हे सुंदर गाणे गायले आहे. जवळची व्यक्ती गेल्यावर जाणवणारी वियोगाची भावना या गाण्यात दाखवण्यात आली आहे. आपल्या लाडक्या गायिका लता दीदींना अखेरच्या प्रवासात पाहत असताना कदाचित शाहरुख खानची अशी अवस्था झाली असावी.

6 फेब्रुवारीला संध्याकाळी मुंबईतील शिवाजी पार्कवर देशातील नामवंत व्यक्तींची गर्दी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वजणच नतमस्तक झाले होते. सर्वांच्या लाडक्या लता दीदींचे पार्थिव मृत्यूशय्येवर होते आणि त्यांना पाहून सर्वजण त्यांना अखेरचा निरोप देत होते.

बॉलीवूड स्टार शाहरुख खान जेव्हा लता दीदींना अखेरचा अभिवादन करण्यासाठी पोहोचला तेव्हा त्याचे दोन्ही हात प्रार्थनेत उंचावले होते. शाहरुखने लता दीदींच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देवाकडे प्रार्थना केली. दुआ वाचून झाल्यावर मास्क काढला आणि फुंकर मारली. लतादीदींकडे पाहिले आणि त्यांच्या पायांना स्पर्श करून प्रेम आणि आदर व्यक्त केला. शाहरुखने हात जोडून नमस्कार केला. शाहरुखच्या या फुंकरवर ‘थुंकला’ म्हणून प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लता दीदींना शाहरुखचा हा अखेरचा सलामही चर्चेचा विषय ठरला. कोणी स्तुती केली, तर कोणी ‘फुंकणे’ ते ‘थुंकणे’ असे सांगून नवा वाद सुरू केला. या वादाच्या भरात शाहरुखने जे केले ते काय होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इस्लाममध्ये फुंकर मारण्याची परंपरा काय आहे?

इस्लामिक परंपरेनुसार, जेव्हा प्रार्थना केली जाते तेव्हा दोन्ही हात छातीजवळ घेऊन प्रार्थना करावी लागते आणि अल्लाहला प्रार्थना केली जाते. नेमका हाच प्रकार आहे, जसे ईश्वरासमोर हात पसरवून प्रार्थना केली जाते, त्याच पद्धतीने दोन्ही हात एकत्र पसरवून त्यांची अल्लाहसमोर विनंती केली जाते.

एखाद्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना, कोणाच्या नोकरीसाठी प्रार्थना किंवा एखाद्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना… काहीही असू शकते. दोन्ही हात जोडून प्रार्थना केल्याचे चित्रही चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. लता दीदींच्या पार्थिव समोर शाहरुखने हेच केले होते. लता दीदींच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी लतादीदींचे लाखो-करोडो चाहते करत असतीलच.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here