बनावट बक्षीसपत्र जमीन हडपल्याचे प्रकरण, आरोपीस न्यायालयीन कोठडी

0

सोलापूर,दि.12: अक्कलकोट रोड येथील जमिनीचे बनावट बक्षीस पत्र तयार करून जमीन हडपल्या प्रकरणी सदर बाजार पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेल्या हरी रामू तिपण्णा कोळी वय 40 वर्ष राहणार सोलापूर पोलीस यास अटक करून न्यायालयात हजर केले असता प्रथम न्यायदंडाधिकारी भंडारी यांनी आरोपीस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश पारित केला.

यात हकीकत अशी की, सोलापूर येथील महानगरपालिका हद्दीतील अक्कलकोट रोडवरील शेतजमीन निवासी क्षेत्रफळ 4 हे 17 आर इतकी शेतजमीन ही फिर्यादी श्रीनिवास मोगलप्पा पोगुल यांना सन 1963 मध्ये वारसा हक्काने वाटणीपत्राद्वारे मिळालेली आहे. तेव्हापासून सदर मिळकत हि फिर्यादी हा कब्जे वहिवाटीत आहे. आरोपी रामु तिपण्णा कोळी, मोहन सत्यण्णा मादास, बलराम दत्तात्रय गुल्लीकोंडा यांनी संगनमत करून फिर्यादीचे मालकीची वर नमुद मिळकत ही सन 1988 साली बक्षीसपत्राद्वारे फिर्यादीने लिहून दिल्याचे भासवून सन 2019 मध्ये गावतलाठी अधिकारी ता. उत्तर सोलापूर यांचेशी संगनमत करून फिर्यादीचे मालकीचे 7/12 उताऱ्यावर आरोपीचे नावाची नोंद करून, फिर्यादीचे मालकीची जमीन ही बनावट बक्षीसपत्राद्वारे व दुय्यम निबंधक कार्यालयाचे बनावट शिक्के तयार करून त्याद्वारे गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्यादीने सदर बाजार पोलिस स्टेशन येथे रामू तिपण्णा कोळी याचे विरूद्ध फिर्याद दाखल केली होती.

प्रस्तुत गुन्हायामध्ये आरोपी रामु तिपण्णा कोळी यास न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. आरोपीने पोलीस कोठडीमध्ये पोलिसां समक्ष बनावट व खोटे बक्षीसपत्र तयार करण्याकरिता काँग्रेस नेते शंकर सातलिंगप्पा म्हेत्रे रा. दुधनी ता. अक्कलकोट जि. सोलापूर त्यांचा कामगार गंदीराम रा. अक्कलकोट यांनी तयार करून दिली आहे. ते त्यांनी कसे तयार करून दिले हे मला माहीत नाही. त्यांनी त्या जमिनीपैकी अर्धी जमीन माझ्या नावावर करून दे असे म्हटल्यानंतर मी त्यास तयार झालो व त्यांनी माझे नाव सातबारा उताऱ्यावर लावले. असे तपास दरम्यान पोलिसांना सांगितलेले आहे.

परंतु तरीही पोलिसांनी अद्याप शंकर म्हेत्रे यास आरोपी केलेले नाही. त्यामुळे याबाबत त्याने राजकीय दबावाचा वापर केलेला असावा अशी चर्चा आहे. आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज रोजी पोलीसांनी आरोपीस न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपी रामु तिपण्णा कोळी यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश पारीत केला.

यात मुळ फिर्यादी तर्फे ॲड.संतोष न्हावकर, ॲड. राहुल रुपनर, ॲड. शैलेश पोटफोडे तर सरकारपक्षा तर्फे ॲड. अमर डोके यांनी तर आरोपी तर्फे ॲड. प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here