Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर 

0
लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

सोलापूर,दि.६: Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रूपये मिळतात. e-KYC केल्यानंतर अनेक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला नाही. दरमहा जमा होणारे १५०० रूपये जमा झाले नाहीत. ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला असल्याने पैसे मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. 

ई-केवायसी (e-KYC) करताना चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक किंवा नजरचुकीने माहिती भरण्यात चूक केली होती, त्यांना आता आपल्या अर्जात सुधारणा करण्याची पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ई केवायसी पोर्टल बंद असल्याने लाडक्या बहिणींचे पैसे थांबले होते. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल सुरू केले आहे. लाडक्या बहिणींना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून आता ३१ मार्चपर्यंत इकेवायसी करता येणार आहे. 

ई-केवायसी प्रक्रियेत कुटुंबातील सदस्यांच्या सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतनाबाबत चुकीची माहिती भरली गेल्याने लाभार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. या तांत्रिक गल्लतीमुळे पात्र महिलांचेही हप्ते रखडले होते. याची दखल घेत प्रशासनाने आता दुरुस्तीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. महिला व बालविकास विभागाने या संदर्भात अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले असून, महिलांनी तातडीने आपल्या अर्जातील त्रुटी सुधारण्याचे आवाहन केले आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here