छत्रपती शिवरायांचा पुतळा झाकला आणि केला अश्लील डान्स 

0
शिवरायांचा पुतळा झाकला आणि केला अश्लील डान्स

कोल्हापूर,दि.१९: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396 वी जयंती मोठ्या उत्साहात राज्यात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त अनेक ठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावात हा संतापजनक प्रकार घडला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून नृत्यांगनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडद्याने झाकून ठेवत नृत्यांगनांचा बिभत्स धिंगाणा घालण्यात आला. या प्रकारामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

वडणगे गावातील यात्रेच्या निमित्ताने एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमात अश्लील स्वरूपाच्या नृत्याचे सादरीकरण झाल्याने त्यासाठी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडद्याने झाकण्यात आला होता. अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

वडणगे ग्रामपंचायत इमारतीसमोर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी तिथे एक मोठे स्टेज उभारण्यात आलं होतं. मात्र, या कार्यक्रमादरम्यान चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून नृत्याचा कार्यक्रम उरकला गेल्याचा आरोप होत आहे. लावणीच्या नावाखाली ‘ॲटम साँग्स’वर अत्यंत अश्लील आणि बिभत्स हालचाली करत नृत्यांगनांनी डान्स केल्याचं समोर आलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here