IPL Auction: आयपीएल 2023 च्या हंगामाकरिता मिनी लिलावात काव्या मारनने 2 खेळाडुंसाठी मोजले इतके कोटी

0

मुंबई,दि.23: Kavya Maran IPL Auction 2023: सन ग्रुपचे संस्थापक उद्योगपती कलानिधी मारन यांची कन्या काव्या मारनने (Kavya Maran) 2 खेळाडुंसाठी 21 कोटी 50 लाख रुपये मोजलेत. इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या हंगामात कोच्चीमध्ये मिनी लिलाव पार पडला. यात सनरायजर्स हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारन पुन्हा एकदा चर्चेत आली. प्रत्येक आयपीएलवेळी काव्या मारनचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काव्या मारनला यावेळी मात्र सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

सर्वाधिक बोली | Kavya Maran IPL Auction 2023

सनरायजर्स हैदराबादने इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकला 13.25 कोटी रुपयांना खरेदी केलं. तर मयंक अग्रवालसाठी 8.25 कोटी रुपयांची बोली लावली. त्यांची ही खरेदी एवढ्यावरच थांबली नाही. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक हेन्री क्लासेनसाठी 5.25 कोटी रुपयांची बोली लावली. तर विवरांत शर्माला 2.60 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली.

जाहिरात

IPL Auction

मिनी ऑक्शनच्या सुरुवातीलाच काव्या मारन आणि तिच्या फ्रँचाइजीने इतरांना मागे टाकत मोठी बोली लावत, पाहिजे असलेले खेळाडू खरेदी केले.

काव्या मारनने सुरुवातीलाच खेळाडूंवर लावलेल्या बोलीनंतर काव्या शॉपिंग करतेय असं काही युजरनी म्हटलं आहे. याशिवाय एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे. यात हॅरी ब्रूकला खरेदी केल्यानंतर काव्याची रिॲक्शन दिसत आहे.

हे असंच चालत राहिलं तर मुंबई इंडियन्सच्या वेळेपर्यंत काव्याची पर्स रिकामी होईल असं एका युजरने म्हटलं आहे.

कोण आहे काव्या मारन?

काव्या मारन ही प्रसिद्ध उद्योगपती कलानिधी मारन यांची मुलगी आहे. कलानिधी हे सन ग्रुपचे संस्थापक आहेत. काव्याने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेल्या लियोनार्ड एन स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए पूर्ण केलं आहे. त्याआधी काव्याने चेन्नईतील स्टेला मारिस कॉलेजमधून बीकॉमची पदवी घेतली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here