kalnirnay: कालनिर्णयने छत्रपती संभाजीराजेंवरून व्यक्त केली दिलगिरी

कालनिर्णयने kalnirnay छत्रपती संभाजीराजेंवरून माफी मागितली आहे.

0

मुंबई,दि.15: कालनिर्णयने kalnirnay छत्रपती संभाजीराजेंवरून माफी मागितली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी कालनिर्णय दिनदर्शिकेवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्याभिषेकाची तारीख न छापल्याने कालनिर्णय (kalnirnay) दिनदर्शिकेवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून होत आहे. आता यावर कालनिर्णयकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून राज्याभिषेक दिनाचा उल्लेख राहून गेल्याचं म्हटलं आहे. तसंच यापुढील सर्व आवृत्त्यांमध्ये हा उल्लेख केला जाईल असंही सांगण्यात आलं आहे.

संभाजीराजेंचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 | kalnirnay

संभाजीराजेंचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी झाला होता. तारखेनुसार छत्रपती संभाजीराजेंच्या राज्याभिषेकाची नोंद कालनिर्णयच्या 2023 च्या दिनदर्शिकेत नसल्यानं याविरोधात अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट्स केल्या होत्या. छत्रपती संभाजीराजेंच्या राज्याभिषेकाची माहिती न देणारी दिनदर्शिका घेऊ नये असं युजर्सनी म्हटलं होतं.

कालनिर्णयने व्यक्त केली दिलगिरी

कालनिर्णयने छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्याभिषेकाची माहिती दिनदर्शिकेत न दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, कालनिर्णय 2023 च्या आवृत्तीमध्ये 16 जानेवारी रोजी असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचा उल्लेख करण्याचं राहून गेलं. यापुढे उर्वरित सर्व प्रतींमध्ये तसेच आवृत्त्यांमध्ये हा उल्लेख केला जाईल असं स्पष्ट केलं आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजा यांच्याविषयी आम्हाला अतिव आदर आहे. छत्रपती संभाजी महाराजप्रेमींच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असल्यास आम्ही मनापासून दिलगीर आहोत असंही कालनिर्णयने म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजेंचा ९ महिन्यांनी छत्रपतींच्या गादीवर विराजमान झाले होते. रायगडवर वयाच्या 23 व्या वर्षी संभाजीराजेंचा राज्याभिषेक पार पडला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here