Vishwas Nangare Patil: सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील सलमान खानच्या घरी

0

मुंबई,दि.६: Vishwas Nangare Patil: अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि वडील लेखक सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खानला धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. सकाळी 7:30 ते 8:00 च्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले. हे धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी सुरक्षेसंदर्भात सलमानच्या घरी जाऊन आढावा घेतला आहे. तसेच सलमान खानची सुरक्ष वाढवली जाण्याची शक्यता आहे. 

मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असून विश्वास नांगरे पाटील यांनी सलमान आणि सलीम खान यांची भेट देऊन दिलासा दिला आहे. सलमान खान याला खाजगी सुरक्षा रक्षक असतात, ते सुरक्षा पुरवत असतात. मात्र मिळालेल्या धमकीच्या चिठ्ठीनंतर मुंबई पोलीस पूर्णपणे खबरदारी घेत आहेत. लेखक सलीम खान हे रविवारी सकाळी आपल्या सुरक्षारक्षकासह वॉकसाठी वांद्रेच्या बॅन्डस्टॅन्ड प्रॉमीनेड येथे गेले होते. व्यायाम झाल्यानंतर ते नेहमीच्या ठिकाणी बेंचवर बसले. त्या बेंचवर त्यांचा सुरक्षारक्षक श्रीकांत हेगिष्टे यांना एक चिठ्ठी आढळली. यात ‘सलीम खान, सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’, असे लिहून त्या धमकीखाली इंग्रजीमध्ये के.जी.बी.एल.बी असे लिहिले होते. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here