Jaydeep Thackeray: राजकारणात आणखी एका ठाकरेची एन्ट्री होणार?

0

मुंबई,दि.8: Jaydeep Thackeray: राजकारणात आणखी एका ठाकरेची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. ठाकरे कुटुंबातील जवळपास सर्वचजणांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पण तरीही ठाकरे कुटुंबातील एक तरुण उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ठाकरे कुटुंबीयातील अनेकांनी पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला स्मिता ठाकरे, निहार ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांनी हजेरी लावली होती.

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर दावा केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. हे दसरा मेळाव्यांच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचे दसरा मेळावे पार पडले. यावरून दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरु आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर घणाघाती टीका केली. 

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे उपस्थित होते. तर ठाकरे गटाच्या मेळाव्यात जयदेव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे नातू जयदीप ठाकरे उपस्थित होते. यावरुन ठाकरे कुटुंबात दुरावा वाढल्याची सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, जयदेव ठाकरे यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी मराठी वृत्तवाहिनी ‘साम’शी संवाद साधला. 

ठाकरे कुटुंबातील कणखर आवाजाचा जयदीप ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. जयदीप ठाकरे यांच्या वडिलांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला असला तरी या तरुणाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. या तरुणाचा आवाज कणखर आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा कणखर आवाज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आहे. पण त्यापुढच्या पिढीतील तरुणांमध्ये हा कणखर आवाज फारसा कुणामध्ये दिसला नाही.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी दिली तर पक्षासाठी काम करीन, असे जयदीप ठाकरे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, “मी बाळासाहेबांचा मोठा नातू, त्या नात्याने जबाबदारी पार पाडत आहे. खरी शिवसेना कोणाची हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेत दोन गट पडतील, असे कधीच वाटले नव्हते. कोरोना काळात काका स्वतः आजारी असताना त्यांनी खूप चांगल काम केले आहे.” 

याचबरोबर, “मी आतापर्यंत दसरा मेळाव्याबद्दल ऐकत होतो, पण यावर्षी गेलो आणि अनुभव घेतला. उद्धव काकांनी संधी दिली तर मी नक्की राजकारणात येईन. बाकी कुटुंब कोणाला पाठिंबा देतंय याबाबत मला बोलायचं नाही. मी बाळासाहेबांचा मोठा नातू म्हणून उद्धव काकांच्या दसरा मेळाव्यात गेलो होतो. मोठा नातू म्हणून मी जबाबदारी पार पाडत आहे”, असेही जयदीप ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सध्याचे राजकीय वातावरण पाहता राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here