सोलापूर,दि. 8: सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचा सत्कार केला आहे. दिल्लीत खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड राज्याचा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा शाल, पूषगुच्छ देऊन खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी सत्कार केला. तसेच या सदिच्छा भेटीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
