सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांचं उद्धव ठाकरे यांच्या बाबत मोठं विधानं

0

मुंबई,दि.20: महाराष्ट्रातील राजकीय प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्रातील राजकीय प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमना (Supreme Court Chief Justice NV Ramana), न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतसोबत इतर याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात एकत्रित सुनावणी पार पडली. यात कोर्टानं दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 27 जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे. तसंच याप्रकरणावर पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार असल्याचं कोर्टानं नमूद केलं आहे. 

सुप्रीम कोर्टात आज दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. यात कोर्टानं सुनावणी 1 ऑगस्टपर्यं पुढे ढकलली असली तरी राज्यातील सत्तेची परिस्थिती जैसे-थे ठेवण्यात यावं अशी मागणी शिवसेनेची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी केली. त्यावर कोर्टानं नेमका काय निर्णय दिला हे फडणवीसांनी यावेळी स्पष्टपणे समजावून सांगितलं.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला अभिमान आहे की हा जो सर्व प्रकार झाला आहे, त्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. त्यात कोर्ट तातडीने तारखा देत आहे, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच अरुणाचल प्रदेशसारखा निकाल महाराष्ट्राच्या बाबतीतही लागू शकतो, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं विधानही जयंत पाटील यांनी केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here