Jakarta Mosque Fire: जकार्ता येथील जामा मशिदीला भीषण आग, आगीत मशिद जमीनदोस्त

0

जकार्ता,दि.20: जकार्ता (Jakarta) येथील जामा मशिदीला भीषण आग (Jakarta Mosque Fire) लागली आहे. आगीत मशीद जमीनदोस्त झाली आहे. इंडोनेशियाची (Indonesia) राजधानी जकार्तामध्ये एका मोठ्या मशिदीला भीषण आग लागली आहे. या आगीच्या दुर्घटनेनंतर मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये मोठ्या जामा मशिदीला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर मशिदीची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. जकार्ता इस्लामिक सेंटरच्या परिसरातील ही मशीद आहे. मात्र या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मशिदीला भीषण आग

इंडोनेशियातील जकार्ता येथील इस्लामिक सेंटर मशिदीला बुधवारी भीषण आग लागली. आगीमुळे मशिदीचा घुमट पत्त्यांसारखा कोसळला. ही आग फार भीषण होती. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणातीही जीवितहानी झालेली नाही. मशिदीच्या घुमटाच्या नूतनीकरणाचं काम सुरू असताना ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग इतकी वेगाने पसरली की काही वेळात ही आग मशिदीच्या घुमटात वेगानं पसरली आणि मशिदीचा धमट जमीनदोस्त झाला.

आगीमुळे मशिदीचा घुमट जळून खाक झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे. इंडोनेशियन मीडियानुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी तीन वाजता अग्निशामक दलाला आग लागल्याची सूचना देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पण आग इतकी भीषण होती की संपूर्ण घुमटात पसरली आणि मशीद कोसळली घुमटाला आग कशी लागली याबाबत कोणतेही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. मात्र, माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते. यादरम्यान आग लागली असावी, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मशिदीचा घुमटाला आग लागली तेव्हा आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. मात्र, आग वाऱ्यामुळे आग मोठी झाली. आग लागल्या तेव्हा सुरुवातीला परिसरातील लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे घुमट पडल्यावर कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here