दि.3: IPL 2022, Sourav Ganguly: मार्चच्या अखेरीस प्रस्तावित असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 15 व्या हंगामाचे आयोजन भारतातच करण्याचा बोर्ड सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली BCCI President Sourav Ganguly) यांनी आयपीएलच्या साखळी फेरीच्या सामन्यांसाठी शहरांचा खुलासा केला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 15 व्या हंगामासाठी यजमान शहरांची नावे जाहीर केली आहेत. सौरव गांगुली म्हणाला की, बोर्डाला यावर्षी भारतात आयपीएलचे आयोजन करायचे आहे. आयपीएलच्या साखळी फेरीचे सामने मुंबई आणि पुण्यात खेळले जाण्याची शक्यता आहे. गांगुलीच्या म्हणण्यानुसार, नॉकआऊट सामन्यांचा विचार अजूनही सुरू आहे.
नॉकआउट सामने विचाराधीन आहेत
एका मीडिया प्लॅटफॉर्मशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, ‘कोविड-19 मुळे कोणतीही विशेष समस्या निर्माण होत नाही तोपर्यंत तो (IPL) भारतातच खेळवला जाईल… जिथे मैदानांचा प्रश्न आहे तर आम्ही मुंबई आणि पुणे येथे लीग सामन्यांसह महाराष्ट्रातच त्याचे आयोजन करण्याचा विचार करत आहोत.
मुंबई आणि पुण्यात साखळी सामने आयोजित करण्याचा आमचा विचार आहे आणि आम्ही काही दिवसांत नॉकआउट फेरीच्या सामन्यांबाबत निर्णय घेऊ शकतो.
बीसीसीआयने अद्याप आयपीएलची अधिकृत सुरुवात आणि वेळापत्रक जाहीर केलेले नाही. यापूर्वी, कोविड-19 मुळे, 2020 चा संपूर्ण हंगाम आणि वर्ष 2021 चा दुसरा टप्पा UAE मध्ये खेळला गेला होता.