जुळे सोलापुरात महात्मा बसवेश्वर मूर्तीची प्रतिष्ठापना

भाग्यवंती देवींसह सवाद्य जलकुंभ मिरवणूक

0

सोलापूर,दि.20: जुळे सोलापूर भागातील शिवबसव चौकातील बसवेश्वर हाॅटेल समोर महात्मा बसवेश्वरांच्या लिंगपूजास्थित मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.सुवासिनींची जलकुंभासह पदयात्रा काढून सुवर्णरथातून बसवमूर्तींची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डाॅ. बसवराज बगले यांच्या पुढाकारातून आणि बसवभक्त समाजसेवक चन्नबसवेश्वर गुरूभेटी यांच्या संकल्पनेतून जुळे सोलापूरच्या सैफुल भागात प्रथमच बसवेश्वरांची मूर्ती दर्शनासाठी उपलब्ध झाल्याने समाजातून आनंद व्यक्त होत आहे.

शनिवारी दुपारी इंचगेरी मठातून जलकुंभ मिरवणुकीचा शुभारंभ झाला. इंचगेरी संप्रदायाचे माताजी पुष्पलता पाटील बसवतत्व प्रसारक सिंधुताई काडादी, सोलापूर बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगोंडा पाटील, महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा पुष्पाताई गुंगे यांच्या हस्ते बसवेश्वरांचे पूजन करून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.

बसवप्रेमी समाजसेवक सर्वश्री बसव अभ्यासक चन्नवीर भद्रेश्वरमठ,सचिन शिवशक्ती,अजिंक्य उप्पीन,विश्वनाथ आमणे,रूद्रप्पा पाटील,निंगोंडा तळे, शंकर कांबळे, भारत गुणापूरे, सिध्दाराम गुरूभेटी, श्रीशैल बगले, राजेश शिवशक्ती, शिवानंद पाटील, सिध्दाराम, खुटेकर, शिवानंद बगले, शिवानंद होनराव, नागनाथ कांबळे, चंद्रकांत चोळके, नागेश कुंभार, मल्लिनाथ नागोजी, सुजाता चोळके, बुरकुल, बाजीराव बुळगुंडे, सुभाष बिराजदार, रावसाहेब साळुंखे, आनंद बिराजदार, प्रदीप जाधव, आदि उपस्थित होते.

शिवबसव ( सैफूल ) चौकातील भाजी मार्केट जवळील बसवेश्वर हॉटेल समोरील टुमदार मंदिरात माजी आमदार शिवशरण पाटील आणि ए.जी पाटील शिक्षण समूहाचे प्रमुख सिध्दाराम पाटील यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.वे.संगय्या स्वामी आणि चन्नय्या स्वामी यांनी धार्मिक विधी आणि मंत्रपठण केले.

त्यानंतर पालखीतून आलेल्या भाग्यवंती देवींच्या पंचधातूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या उपस्थितीत झाली.जलकुंभ मिरवणुकीतील ” सुवासिनींचा हळदी- कुंकू ” कार्यक्रम आणि बसव वचन पठणामुळे कार्यक्रमात वेगळा बहार आला होता.कार्यक्रमात बहुसंख्य बसवप्रेमी समाजबांधव आणि बसवेश्वर मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय धनशेटटी,प्रकाश अंगडी,अश्विनी पांचाळ,रेखा अंगडी,रूपा धनशेटटी,पूजा आलुरे,आदिनी परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here