संजय राऊत ईडी प्रकरणात छगन भुजबळ यांचं सूचक वक्तव्य

0

नाशिक,दि.४: शिवसेना नेते संजय राऊत ईडी प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत न्यायालयाने आणखी वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांना आता ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत राहावं लागणार आहे. ईडीने राऊतांवर गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी कारवाई केलीय. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नसल्याचं म्हणत सूचक इशारा दिला आहे. ते गुरुवारी (४ ऑगस्ट) नाशिकमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, “संजय राऊतांना मिळालेली ईडीची कोठडी हा न्यायालयीन कामकाजाचा भाग आहे. ईडीने न्यायालयात काही गोष्टी मांडल्या असतील. नेमक्या काय गोष्टी न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या याबाबत मी ऐकलेलं नाही. मात्र, अधिक तपासासाठी न्यायालयाने संजय राऊतांना ईडी कोठडी सुनावली असावी.”

लवकर जामीन मिळत नाही

पत्रकारांनी संजय राऊत यांची निर्दोष सुटका होईल का? असा प्रश्न विचारला. यावर भुजबळ म्हणाले, “संजय राऊत यांच्यावर राजकीय सुडापोटी कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत निर्दोष सुटतील की नाही याबाबत मला तसं काहीही सांगता येणार नाही. ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि याची सर्वांना कल्पना आहे. त्यातूनही काही मार्ग निघाला तर आमच्या त्यांना शुभेच्छाच आहेत.”

लोकसभेत पण ईडीच्या कारवायांसंदर्भात राष्ट्रवादी बोलते, सुप्रिया ताई बोलत आहे. अनेक विरोधी पक्षांनी म्हटलंय हा कायदा राक्षसी आहे. म्हणून हा कायदा युपीएच्या काँग्रेसच्या काळातच बनवला गेलाय, हा कायदा चिदंबरम यांनी बनवला, त्यामुळे भाजपला तरी काय म्हणायचे? असा सवालही भुजबळांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here