काशी पीठाचे जगदगुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांचा अमृतमहोत्सव संपन्न
वाराणसी,दि.१२: मोगल आणि इतर परकीयांनी अनेक आक्रमण करत भारतीय संस्कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी भारतातील संत-महंत आचार्य आणि ऋषीमुनींनी विचारांची पेरणी केली. त्यामुळे देश वासियांमध्ये मोठी ताकद निर्माण झाली. त्या ताकदीच्या जोरावरच नामोहरम झाले. मुळात देशाचा एकोपा धर्मावर आधारित आहे. त्यामुळेच प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती टिकून असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केले.
काशी येथील जंगमवाडी मठात उत्तराधिकारी पट्टाभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचा अमृत महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते
यावेळी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैन पीठाचे जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, श्रीशैल पीठाचे जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, कर्नाटक भाजप अध्यक्ष ईश्वरप्पा, काशी पीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, बागलकोटचे आ. इरण्णा चरणकोटे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आळंदचे माजी आ. बी. आर. पाटील, माजी मंत्री कृपाशंकर सिंग, माजी आ. विश्वनाथ चाकोते, मंद्रूपचे रेणूक शिवाचार्य, मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य स्वामी, श्रीकंठ शिवाचार्य स्वामी, होटगी मठाचे उत्तराधिकारी योगीराजेंद्र शिवाचार्य स्वामी, यांच्यासह देशभरातील शिवाचार्य, संत-महंत, आचार्य भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेला भारतात मोठे स्थान आहे. यामुळेच जगात भारताचा दबदबा टिकून आहे. संतानी जगण्याची शिकवण देण्याबरोबरच संस्कृती टिकवण्याचे मोठे काम केले. यामुळेच जगात भारतीय संस्कृतीला आजही सन्मान आहे. मोगल आणि ब्रिटीशांनी संत महंतांच्या मठ, मंदिरे आणि धार्मिक स्थळावर हल्ले करून हिंदूं संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी संतांच्या विचारांच्या बळावर अडवली गेली आणि त्यांची आक्रमणे परतवून लावली गेली.
प्रारंभी स्वागत सिद्धलिंग शिवाचार्य यांनी केले. संगय्या शास्त्री यांनी स्वागतगीत गायले. खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी प्रास्ताविक केले. अमृतमहोत्सव नंतर काशी पीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचा मस्तकाभिषेक आणि हरिद्र लेपन करण्यात आले.
याप्रसंगी सचिव शांतय्या स्वामी, सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, प्रभुराज विभुते, दिलीप दुलंगे, राजेंद्र गंगदे, माजी सभागृह नेता शिवानंद पाटील, बाजार समिती संचालक केदारनाथ उंबरजे, विराज पाटील, माजी नगरसेवक नागेश भोगडे, प्रतिक थोबडे, वीरशैव व्हिजनचे राजशेखर बुरकुले आदी उपस्थित होते.