India Population: भारताने चीनला टाकले मागे, भारताने चीनचा हा रेकॉर्ड मोडला

0

नवी दिल्ली,दि.19: India Population: भारत आणि चीन यांच्यातील स्पर्धा साऱ्यांनाच माहिती आहे. परंतू, एका नकोशा गोष्टीमध्ये भारताने चीनला मागे टाकले आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता चीन (China) नसून आपला भारत (India) देश आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच जागतिक तज्ञांनी 2023 मध्ये भारत हा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असेल असा अंदाज वर्तवला होता. आता युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA)च्या ताज्या आकडेवारीने याची पुष्टी केली आहे. (India Overtake China in Population)

युएनएफपीएने ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, 2023’ रिपोर्ट प्रकाशित केला आहे. याचे शीर्षक 8 बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स अँड चॉइस असे आहे. हा रिपोर्ट युएनने आजच जाहीर केला आहे. अहवालातील ताजी आकडेवारी ‘डेमोग्राफिक इंडिकेटर्स’ या श्रेणीमध्ये देण्यात आली आहे.

हेही वाचा Ashish Shelar On Maharashtra Politics: अमित शाह यांच्याबरोबर महाराष्ट्राच्या सत्तांतरावर काय चर्चा झाली? आशिष शेलार म्हणाले…

भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश | India Population

युनायटेड नेशन्स (UNFPA)च्या आकडेवारीनुसार, भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या (Population) जास्त आहे आणि देशाची लोकसंख्या वाढत-वाढत 140 कोटींच्या पुढे गेली आहे. तर, चीनमधला जन्मदर यंदा चांगलाच खाली घसरला असल्याने त्यांची लोकसंख्या काहीशी आटोक्यात येत आहे.

भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त | India Overtake China in Population

UNFPA चा ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023’ हा ‘8 बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स अँड चॉइस’ या शीर्षकाने प्रसिद्ध केला गेला आहे. यात नमूद केल्याप्रमाणे भारताची लोकसंख्या आता 1,428.6 दशलक्ष आहे, तर चीनची लोकसंख्या 1,425.7 दशलक्ष आहे. म्हणजेच दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये 2.9 दशलक्ष इतका फरक आहे.

युनायटेड नेशन्सच्या लोकसंख्या आकडेवारीत 1950 पासून भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त नोंदवली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. खरे तर 1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर युनायटेड नेशन्सची स्थापना झाली आणि 1950 पासून त्यांनी लोकसंख्येची आकडेवारी गोळा करण्यास सुरुवात केली. 1950 ते 2023 या कालावधीत युनायटेड नेशन्सने नोंदवलेल्या लोकसंख्येचा तक्ता पाहिला तर भारताची लोकसंख्या अशा प्रकारे वाढली-

2023 मध्ये भारताची लोकसंख्या 1,428,627,663 आहे, जी 2022 च्या तुलनेत 0.81% जास्त आहे.

2022 मध्ये भारताची लोकसंख्या 1,417,173,173 होती, जी 2021 च्या तुलनेत 0.68% जास्त होती.

2021 मध्ये भारताची लोकसंख्या 1,407,563,842 होती, जी 2020 च्या तुलनेत 0.8% जास्त होती.

2020 मध्ये भारताची लोकसंख्या 1,396,387,127 होती, जी 2019 च्या तुलनेत 0.96% अधिक होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here