सोलापूर,दि.१०: india pakistan war marathi news | काल रात्रीपासून पाकिस्तानी सैन्य भारतीय लष्कर आणि निवासी ठिकाणांवर सतत हल्ले करत आहे, ज्याला भारतीय सैन्य योग्य प्रत्युत्तर देत आहे. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त केले आहेत.
india pakistan war marathi news
ज्या दहशतवादी लाँच पॅडवरून पाकिस्तानी सैन्य ड्रोन हल्ले करत होते. ते भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले आहेत. पाकिस्तान सतत हल्ले करत आहे. पाकिस्तानकडून हवाई हल्ले वाढल्यानंतर भारतीय लष्करानेही जबरदस्त प्रहार सुरू केला आहे. (india pakistan war information in marathi)

या व्हिडिओमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचे दहशतवादी लाँच पॅड कसे उद्ध्वस्त केले आहेत आणि शेजारील देशाचे कंबरडे कसे मोडले आहे हे पाहता येते.
यापूर्वी, पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमेवरील भारतातील अनेक निवासी भागांना लक्ष्य केले होते. जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर आणि राजौरी तसेच पंजाबमधील जालंधर येथे स्फोट झाले. पाकिस्तानकडून भारतातील निवासी भागांवर ड्रोन हल्ले केले जात आहेत. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि पठाणकोटमध्ये पहाटे मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. (india pakistan war marathi news)
ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने ८ आणि ९ मे च्या रात्री भारताच्या पश्चिम सीमेवर एकाच वेळी अनेक हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानने ड्रोन आणि इतर शस्त्रास्त्रांद्वारे भारतीय सीमांना लक्ष्य केले. यासोबतच जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.